Tue, Aug 04, 2020 14:01होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कागल तालुक्यातील 'या' गावात समूह संसर्गाचा धोका

कोल्हापूर : कागल तालुक्यातील 'या' गावात समूह संसर्गाचा धोका

Last Updated: Jul 16 2020 7:55AM
सिद्धनेर्ली (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर व्हन्नूर (ता. कागल) येथील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्याच्या संपर्कात आलेल्या सात जणांना कागल येथील अलगीकरण कक्षामध्ये हलविण्यात आलेले असून त्याचीही चाचणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी व्हन्नूर येथे कोरोना रुग्ण सापडल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला तहसीलदार शिल्पा ठोकडे काही सूचना पालन करण्यास सांगितले. 

अधिक वाचा :  साखर विक्री किंमत २ रुपयांनी वाढली

व्हन्नूर येथील दोन पुरुष व एक महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पती-पत्नी आणि एका युवकाचा समावेश आहे. तिघांची कोरोना चाचणी केल्यावर हे बाधित आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. हे तिघे एका रुग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. तसेच यांच्या संपर्कात आलेल्या बाकी सात जणांना देखील अलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. त्याचे रिपोर्ट अद्यापही आले नसून आज (ता.१६) संध्याकाळपर्यंत त्यांचे अहवाल येणे अपेक्षित आहे.

अधिक वाचा : विमानतळावर नाईट लँडिंगसाठी प्रयत्न : खा. संभाजीराजे यांची ग्वाही

गेली काही महिने गावाने अतिशय काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन केलेले असताना अचानक रुग्ण सापडल्याची माहिती मिळताच गावात भीतीचे वातावरण पसरले. कोरोना रुग्ण सापडल्याने गावामध्ये खबरदारी म्हणून औषध फवारणी करण्यात आलेली असून पुढील १४ दिवस गाव बंद करण्यात येणार आहे. सध्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.