गणेशमूर्ती पाहण्यासाठी गर्दी

Published On: Sep 09 2019 1:41AM | Last Updated: Sep 08 2019 11:52PM
Responsive image


कोल्हापूर : प्रतिनिधी 

पावसाने रविवारी दुपारनंतर उघडीप दिली. त्यामुळे रविवारच्या सुट्टीचा योग साधत शहरवासीयांनी संध्याकाळी सहकुटुंब सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. महापुरामुळे तरुण मंडळांनी देखावे रद्द करून फक्‍त गणेशमूर्ती व आकर्षक आरास केली आहे. काही ठिकाणी प्रबोधनात्मक तांत्रिक देखावे आहेत. तरुण मंडळांनी मंडपाबाहेर महापुरावर भाष्य करणारी होर्डिंग व फलक लावून प्रबोधनात्मक सादरीकरण केले आहे.   

यंदाच्या वर्षी आकर्षक आणि कलात्मक गणेशमूर्तींबरोबर सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्याकडे सार्वजनिक मंडळांनी अधिक लक्ष दिले आहे. यंदा उद्भवलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोल्हापूरवासीयांनी एकत्र येत महापुराचा केलेला सामना देखाव्यांच्या माध्यमातून खास  करून प्रबोधन फलक लावून दाखविण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे. दरवर्षी कसबा बावडा परिसरात सुमारे पन्‍नासहून अधिक सजीव देखावे असतात. मात्र, यंदा महापुरामुळे एकाही मंडळाने देखावा केला नाही. लहान मंडप घालून गणेशमूर्ती व आरास करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. शाहूपुरी, राजारामपुरी व लक्ष्मीपुरी या परिसरात विद्युत रोषणाईसह तांत्रिक देखावेच सादरीकरण केले जाते. या परिसरात महापुराचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. 

मंगळवार पेठ, शिवाजी पेठ आदी परिसरात सजीव देखावे व तांत्रिक देखावे असतात. त्या भागात यंदा आकर्षक गणेश मूर्ती आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावर महापुराची छाया असून कार्यकर्त्यांचा उत्साह असला तरी नेहमीची गर्दी दिसत नाही. 

रविवारची सुट्टी असल्याने अनेक जण सहकुटुंब गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले. शिवाजी चौक परिसरात महागणपतीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. शहरात भक्‍तिमय व उत्साहवर्धक वातावरण असले तरी त्यावर महापुराची गडद छाया ठळकपणे जाणवते.चंद्रकांत पाटील यांचा पायगुणच असा आहे की जाईल तिथे त्यांचा कार्यक्रम होतो : सतेज पाटील


ढगाळ हवामान, गार वारा वाहतोय! जाणून घ्या हवामानातील हा बदल कशामुळे? (व्हिडिओ)


कोल्हापूरनंतर पालघरमध्येही आदिवासी महिलेची वाटेतच झाली प्रसूती, बालकाचा मृत्यू, मातेची मृत्यूशी झुंज 


साखर कामगारांचा राज्यव्यापी संप मागे 


ठाणे : धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग, खाली फेकण्याचा प्रयत्न, दोघांना अटक 


दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप


हिमांशी खुराना जेव्हा पार्टीत रडते तेव्हा...(video) 


अर्थव्यवस्था संकटातून सावरतेय; तांत्रिक मंदीला काहीही अर्थ नाही : नीती आयोग


काही लोकांना आमचं सरकार आल्याने अडचणी आल्या : जयंत पाटील


पंतप्रधानांकडून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना लसीचा आढावा