Wed, Jan 20, 2021 08:14होमपेज › Kolhapur › कापड खरेदीत कोटीची फसवणूक

कापड खरेदीत कोटीची फसवणूक

Last Updated: Oct 21 2019 1:43AM
इचलकरंजी (वार्ताहर) ः कापड खरेदी व्यवहारात 1 कोटी 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदाबाद (गुजरात) येथील दिनेश जेठाभाई पटेल, प्रवीण जेठाभाई पटेल व पिंकेश सुरेशभाई पटेल या तीन व्यापार्‍यांच्या विरोधात गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अमोल परशमराम मोरे (वय 33, रा. साळुंखे मळा) यांनी फिर्याद दिली आहे.

येथील सांगली रोडवरील साळुंखे मळा परिसरातील अमोल मोरे यांची सुवर्णा ग्रुप नावाची फर्म आहे. जून 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत दिनेश, प्रवीण व पिंकेश पटेल यांनी मोरे यांच्याकडून 1 कोटी 2 लाख 9 हजार 366 रुपयांचे ग्रे कापड खरेदी केले. मात्र, बिलाची मागणी करता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. तसेच आमची वरपर्यंत ओळख असून पुन्हा पैसे मागू नकोस, आमच्या पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नकोस, गुजरातला आलास तर जिवंत परत जाणार नाहीस, अशा धमक्या मिळू लागल्या. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोरे यांनी  तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास स.पो.नि. गजेंद्र लोहार करीत आहेत.