Mon, Sep 21, 2020 12:42होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : उपजिल्हा रुग्णालयातील नर्स, बँक कर्मचाऱ्याला कोरोना

कोल्हापूर : उपजिल्हा रुग्णालयातील नर्स, बँक कर्मचाऱ्याला कोरोना

Last Updated: Aug 07 2020 9:46AM

संग्रहीत छायाचित्रगडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील एक नर्स आणि हेब्बाळमधील बँक ऑफ इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. गडहिंग्लज शहरात आज नवीन ४ बाधित आढळले असून तालुक्यातील महागावमध्ये २, कडगाव २, गिजवणे व मुगळीमध्ये प्रत्येकी एक असे १० रुग्ण  वाढले आहेत.

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले (video)

उपजिल्हा रुग्णालयातील नर्सचा पती कोरोना बाधित झाला होता. तर त्याच्या संपर्कात आल्याने तिलाही कोरोनाची लागण झाली. दरम्यान संबंधीत नर्स गेल्या चार दिवसांपासून सुट्टीवर असल्याने तिचा उपजिल्हा रुग्णालयातील कोणाशीही संपर्क आलेला नाही. त्यामुळे संपर्काचा धोका थोडा कमी झाला आहे. तसेच हेब्बाळमधील बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी मात्र कामावर असल्याने त्यांच्यामधून संपर्क बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुगळीमधील २९ वर्षीय व्यक्ती जम्मूहुन आलेली आहे. तर कडगावमधील दोन्ही महिला कशा बाधित झाल्या याचेही प्रशासनाला अजूनही काही कळलेले नाही. त्यांची प्रवासाची कोणतीच हिस्टरी नाही. तर गिजवणेतील बाप-लेक हे कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यात 354 कोरोना रुग्ण; 6 मृत्यू

 "