Mon, Aug 10, 2020 08:34होमपेज › Kolhapur › इचलकरंजीमधील प्रसिद्ध कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकाना कोरोनाची लागण!

इचलकरंजीमधील प्रसिद्ध कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकाना कोरोनाची लागण!

Last Updated: Jul 16 2020 8:18PM

संग्रहित छायाचित्रइचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा 

परिसरात प्रसिद्ध असलेल्या एका सहकारी साखर कारखानाच्या व्यवस्थापकीय संचालकाना कोरोनोची लागण झाली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इचलकरंजीसह परिसरातील ग्रामीण भागात कोरोनोचा प्रभाव वाढला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहे. त्यात राजकीय नेत्यांसह नातेवाईकांचा समावेश आहे.

राजकीय नेत्याचा प्रभाव असलेल्या एका सहकारी साखर कारखानाच्या व्यवस्थापकाने कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वॅब दिला होता. त्याच्या अहवालाकडे लक्ष लागले होते. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच या कारखान्याशी संबंधित एकाला कोरोनोची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या संसर्गातून कोरोनोची लागण झाली का याबाबत प्रशासन माहिती घेत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्याची माहिती घेतली जात आहे.