हिंदी, मराठी गीत नृत्यांचा रंगारंग कार्यक्रम

Last Updated: Nov 08 2019 10:18PM
Responsive image


कोल्हापूर ः प्रतिनिधी 

सज्जनांचे रक्षण करीत दुष्टांचे निर्दालन करा, असा सामाजिक संदेश देणारी त्रिपुरारी पौर्णिमा दिव्यांच्या प्रकाशाने मंगळवारी (दि. 12 ) शहरात साजरी  होत आहे. यानिमित्त दै. ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या वतीने हिंदी-मराठी गीते आणि बहारदार नृत्याचा रंगारंग कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे दि. 12 रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे. त्यानंतर दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. 

एकीकडे प्रकाशाचा उत्सव आणि दुसरीकडे सूरताल अशा वातावरणात त्रिपुरारी पौर्णिमेची सायंकाळ तेजाने उजळून निघणार आहे. कस्तुरी क्लब सोबत दीपोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकीने किमान दोन पणत्या सोबत आणाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.  या दिवशी त्रिपूर असुराचा संहार झाल्याबद्दल ही पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वाती लावणे, वाती जाळणे, दीपपात्री दान करणे असा विधी शास्त्रात सांगितला आहे. त्यानुसार त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.

आजच सभासद व्हा... 
कस्तुरी क्लब सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी नावनोंदणी  सुरू राहणार आहे. सभासद नोंदणी शुल्क 600 रुपये असून सभासद झाल्यावर लगेचच 1499 रु. ची सूर्या कंपनीची सिंगल बर्नर शेगडी मोफत मिळेल. याव्यतिरिक्त अग्रवाल गोल्ड आणि सिल्व्हर यांच्याकडून गोल्ड प्लेटेड छोटे मंगळसूत्र मिळेल. याशिवाय प्रत्येक सभासदांना वाढदिवस, डिस्काऊंट, लकी ड्रॉ कूपन्समधून 5925 रुपयांचे फायदे मिळणार आहेत. याकरिता टोमॅटो एफ एम कार्यालय, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 8805007724 / 8805024242 / 9404684114