Sat, Sep 19, 2020 08:37होमपेज › Kolhapur › आजरा तहसीलमधील क्लार्कला कोरोना 

आजरा तहसीलमधील क्लार्कला कोरोना 

Last Updated: Aug 03 2020 3:24PM

संग्रहित छायाचित्रआजरा : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आजरा तहसील कार्यालयातील क्लार्कला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महसूल विभागाला चांगलाच हादरा बसला आहे. संबंधीत कर्मचार्‍याच्या संपर्कातील व्यक्ती, कर्मचार्‍यांची माहिती घेवून त्यांना स्वॅब तपासणीकरीता पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून तहसील कार्यालय परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. 

वाचा : कोल्हापूर : २९ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

आजरा तहसील कार्यालयातील क्लार्क नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयात कामावर आला असता त्यांना त्रास सुरु झाला. दरम्यान येण्यापुर्वी त्यांनी सकाळी खासगी रुग्णालयात उपचार घेतला असल्याचे समजते. त्रास सुरु होताच कोविड सेंटर येथे त्यांचा स्वॅब घेवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातच काही दिवसांपुर्वी गडहिंग्लजवरुन सदरच्या कर्मचार्‍यासोबत इतर तिघेजण आले होते. त्यामुळे त्यांचीही तपासणी करण्यात आली असून सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तहसिल कार्यालयातील इतर कर्मचार्‍यांचे स्वॅब घेतले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याने महसूल विभागातील कर्मचार्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

वाचा : गारगोटीतील तोतया सीआयडी इन्स्पेक्टर युवती गजाआड

 "