Mon, Jun 01, 2020 03:59होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : स्वयंशिस्तीने नागरिकांनी घरी राहून सहकार्य करावे

कोल्हापूर : स्वयंशिस्तीने नागरिकांनी घरी राहून सहकार्य करावे

Last Updated: Apr 02 2020 7:15PM

महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टीकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

शहरामध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. शहरामध्ये प्रभागनिहाय विकेंद्रीत स्वरुपात भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून स्वयंशिस्तीने घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केले.

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात कोरोनाचा संशयित रुग्ण 

महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या विकेंद्रीत भाजीपाला विक्री ठिकाणांची पाहणी आज केली. यावेळी त्यांनी नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, महापालिकेच्यावतीने नागरिकांच्या सोयीसाठी विकेंद्रीत पध्दतीने भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विक्रेत्यांमध्ये अंतर ठेवण्यात आले आहे. किरणा माल, मेडिकल दुकानेही नागरिकांसाठी सुरु आहेत. कृपया गर्दी करु नका. आपा-पल्या भागात गरजे इतकाच भाजीपाला खरेदी करा. याच पध्दतीने संपूर्ण शहरात महापालिका नियोजन करत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.