Thu, Sep 24, 2020 08:11होमपेज › Kolhapur › ब्लॉग : कसे होते लहान मुलांचे शोषण?

ब्लॉग : कसे होते लहान मुलांचे शोषण?

Published On: Feb 28 2018 5:35PM | Last Updated: Feb 28 2018 5:33PMधनाजी सुर्वे, पुढारी ऑनलाईन 

लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, विनभंगाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. समाजातील या भीषण परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर, जबाबदार नागरिक म्‍हणून प्रत्येकाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्याकडे लैंगिकता या शब्दाबद्दल अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. परिणामी लैंगिक अत्याचार आणि शोषण यातही आपल्यात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे हा विषय समजून घेतल्यास या प्रकारच्या घटना नियंत्रणात आणण्यास आपण एक टप्पा पुढे सरकू शकतो.  

संबंधित बातम्‍या : ब्लॉग : येणारी पिढी कुणालाच माफ करणार नाही

लैंगिक आत्‍याच्यार झाल्‍यावरच शोषण झाले असे म्‍हणायचे का? हा प्रश्न समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान मुलांना आपल्‍यावर झालेल्‍या अन्यायाला आणि संकटाला तोंड देता येत नाही. अत्‍याचार झालेल्‍या मुलाने आपल्‍यावरील आत्‍याचाराबात कोणाकडे तक्रार मांडली तरी त्‍याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्‍या मुलावर कोणत्‍या प्रकारचे अत्‍याचार झाले आहेत, हे सुध्दा पाहिले जात नाही. पीडित मुलाला किंवा मुलीला आल्‍याचारानंतर अत्‍यंत वाईट परिस्‍थिला सामोरे जावे लागते. बेदम मारहाण, लैंगिक शोषण, छेडछाड, अपहरण, अर्भकांना बेवारस सोडून देणे, त्‍यांच्याशी अश्लिल  भाषेत बोलणे,  अशा अनेक प्रकारे लहान मुलांचे शोषण होते. 

ज्या कृत्‍याद्वारे मुलाच्या किंवा मुलीच्या शरीराला इजा पोहोचेल असा स्पर्श, आणि अशी कोणतीही कृती, भाषण, वर्तन ज्यामुळे ते मूल घाबरेल, लज्जित होईल, अवमानित होईल हे सर्व बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडते. तसेच अशी कोणतीही कृती किंवा दुर्लक्ष ज्यामुळे मुलांची निकोप वाढ होण्यास बाधा येईल. एकलकोंडे पडल्‍याचा भास हाईल. ही सर्व कृत्‍ये बालकांच्या शोषणा अंतर्गत येतात. 

शारीरिक शोषण : 

बालकाला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करणे. डाग देणे, जाळणे, मारणे, गुद्दे घालणे, लाथा मारणे, छडीचा मार, मुलाला गदगदा हालविणे किंवा मुलाला इजा पोहोचेल असे वर्तनाने त्‍याचे शारीरिक शोषण होते. पालकांकडून मुलांना शिस्‍त लावण्यासाठी कोणत्‍याही प्रकारची शारीरिक शिक्षा केली तर त्‍या मुलाचे शारीरिक शोषण होते.  वयाच्या ५ वर्षापासून १२ वर्षापर्यंतच्या मुलांना शोषणाचा व त्यांच्याशी गैरवर्तन केले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. या अत्याचारांमध्ये शारीरिक, लैंगिक तसेच मानसिक अत्याचारांचा समावेश होतो.

भावनिक शोषण : 
लहान मुलांना शिव्या देणे, त्‍यांच्यावर मानसिक अत्याचार करणे किंवा त्यांच्याशी मानसिक खच्चिकरण रणे भावनिक शोषणां अंतर्गत येते. पालक किंवा देखभाल करणार्‍या व्यक्तींकडून जास्‍त प्रमाणात भावनिक शोषण होते. मुलाला अंधार्‍या खोलीत बंद करणे,  कपाटात बंद करणे किंवा बराच वेळ खुर्चीला बांधून ठेवणे किंवा मुलाला धमकावणे, घाबरविण्यासारखे प्रकार केले जातात.  मुलाला कायम कमी लेखणे, त्याला सतत दूर लोटणे त्याचेवर निष्कारण आरोप करणे किंवा एखाद्या गोष्‍टीला जबाबदार धरणे हा सर्व प्रकार भावनिक शोषणात भर घालणारा आहे.   

उपेक्षा : 
एखाद्या कुटुंबात मुलांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. त्‍याला हव्या असणाऱ्या गोष्‍टी त्‍याला दिल्‍या जात नाहीत. अन्न, वस्त्र, पुरेशी वैद्यकीय काळजी, देखरेख न पुरविणे, मुलाचा त्याग करणे, त्याची शाळेची फी न भरणे, मुलाला योग्य प्रकारे शाळेत दाखल न करणे उपेक्षा शोषणा आंतर्गत येते.    

मानसिक उपेक्षा : 
मुलाला भावनिक आधार व प्रेम न देणे, मुलाकडे लक्ष न देणे, त्याची काळजी न घेणे, आई-वडिलांमधील भांडणांना त्याला सामोरे जावे लागणे, मुलांसमोर व्यसने करणे, त्‍याला व्यसनाच्या आहारी घालवण्याचा प्रयत्‍न करणे, मानसिक उपेक्षे अंतर्गत येते. 

मुलांचा लैंगिक छळ  
नुकतीच जन्मलेली लहान बाळे, किंवा थोडी मोठी मुले लैंगिक छळाला बळी पडतात. तसेच व्यंग असणारी किंवा मंदबुद्धी मुले त्यांच्या निराधारामुळे जास्तीत जास्त प्रमाणात लैंगिक छळाला बळी पडतात. बलात्कार किंवा लैंगिक कृत्याचे चित्र वा व्हिडिओ  दाखवणे. मुलांना संबंधासाठी उत्तेजित करण्यासाठी त्यांच्या अवयवांना स्पर्श करणे, मुलांना अश्लील चाळे दाखवणे वा दोन मुलांना आपापसात अश्लील चाळे करायला लावणे. लैंगिक छळा अंतर्गत येते. 

मुलांचे शोषण थांबवण्यासाठी आपण फक्त आपल्या आजूबाजूच्या परिसरात जागरूक राहणे आणि गैरवर्तनांची तक्रार करणे आवश्यक आहे.