Wed, Jul 15, 2020 23:52होमपेज › Kolhapur › ‘मुख्यमंत्री सहाय्य’ सुरू राहणार

‘मुख्यमंत्री सहाय्य’ सुरू राहणार

Last Updated: Nov 18 2019 1:26AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे 405 कोटी रुपये आणि 600 शस्त्रक्रिया खोळंबल्या होत्या.त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले होते. 16 नोव्हेंबर रोजी दैनिक ‘पुढारी’मध्ये ‘राष्ट्रपती राजवटीमुळे जिल्ह्यात 600 शस्त्रक्रिया खोळंबल्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. 

या वृत्ताची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव नामदेव माळी यांनी त्यासंदर्भात आदेश जारी करून अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून राज्यातील सुमारे 21 लाख रुग्णांना गेल्या पाच वर्षांत 1,600 कोटींचा मदत झाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून या कक्षाचे काम ठप्प होते. त्यामुळे राज्यातील पाच हजार 657 रुग्णांच्या उपचाराला ब—ेक लागल्याने अनेक शस्त्रक्रिया खोळंबल्या होत्या. 

राज्यातील आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचे व्यवस्थापन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केले जाते. राष्ट्रपती राजवटीत या कक्षाचे काम थांबले होते. त्यामुळे हजारो रुग्णांचा जीविताचा प्रश्‍न निर्माण झाला होता. बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे काम पूर्ववत सुरू केले आहे. त्यासाठी एक सहायक संचालक, दोन सहायक लेखाअधिकारी यांची तातडीने नियुक्‍ती केली आहे. हा कक्ष सुरू झाल्याने शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असणार्‍या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.