Sun, Jul 05, 2020 02:30होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात महाजनादेश यात्रा, विकास कामांची मुख्यमंत्र्यांची ग्वाही (video)

कोल्हापुरात महाजनादेश यात्रा, विकास कामांची मुख्यमंत्र्यांची ग्वाही (video)

Published On: Sep 17 2019 4:12PM | Last Updated: Sep 17 2019 6:03PM

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांसोबत, मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, आ. अमल महाडिककोल्हापूर - पुढारी ऑनलाईन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा शहरामध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी कोल्हापूरसह जिल्ह्याच्या विकासाची ग्वाही दिली. तसेच आगामी निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेला मताचा आशीर्वाद मागितला.


कोल्हापुरातील गेल्या ५० वर्षापासून रखडलेली कामे करण्यात येतील असे फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूरचा रोड शो झाल्यानंतर ते बिद्रीला रवाना झाले. त्यानंतर फडणवीस राधानगरीलाही जाणार आहेत.


कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नर येथून जनादेश यात्रा दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई फुले रुग्णालय, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर पेट्रोल पंप, आयटीआय मार्गे कळंबा येथे ही यात्रा पोहोचली. तेथे सभा घेण्यात आली.


कळंबा येथील सभा आटोपून इस्पुर्ली व बिद्री येथे महाजनादेश यात्रा गेली. पुढे मुधाळ तिट्टामार्गे राधानगरी येथे ही यात्रा पोहोचली. त्यानंतर दाजीपूर येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनादेश यात्रेचा प्रवेश होणार आहे.