Wed, Sep 23, 2020 21:41होमपेज › Kolhapur › ‘सीएए’बाबत भाजप कार्यकर्त्यांनी प्रबोधन करावे ः प्रदेशाध्यक्ष पाटील

‘सीएए’बाबत भाजप कार्यकर्त्यांनी प्रबोधन करावे ः प्रदेशाध्यक्ष पाटील

Last Updated: Dec 24 2019 1:54AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्याही धर्माविरुद्ध नसून, या कायद्याने कोणाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. त्यामुळे या कायद्याबाबत भाजप कार्यकर्त्यांनी प्रबोधन करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले.

आ. पाटील हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आले असून, सोमवारी त्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्ष पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्याशी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत संवाद साधला.

आ. पाटील म्हणाले, विरोधक या कायद्याबाबत समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत. हा कायदा कोणाचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही. या कायद्याचे महत्त्व, व्यापकता, हा कायदा नेमका कोणत्या नागरिकांसाठी आहे याचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत लोकांसमोर मांडले पाहिजे. या कायद्याबाबतची माहिती सर्व सामान्य नागरिकांना होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी माहितीपत्रकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत, घरोघरी संपर्क साधून, लोकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करून जनजागृती करावी, असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गटनेते विजय सूर्यवंशी, आर. डी. पाटील, अ‍ॅड. संपतराव पवार, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर, आशिष ढवळे, किरण नकाते आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले.

 "