Wed, Aug 12, 2020 09:28होमपेज › Kolhapur › केएमटी तिकीट दरवाढीला प्राधिकरणाची मंजुरी

केएमटी तिकीट दरवाढीला प्राधिकरणाची मंजुरी

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:20AMकोल्हापूर ः प्रतिनिधी  

केएमटीच्या तिकीट दरवाढीला प्राधिकरणाने गुरुवारी मंजुरी दिली. एक ते पाच रुपयांपर्यंत ही दरवाढ असणार आहे. 20 ऑगस्टपासून दरवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्यासाठी आता आठ रु. तिकीट होणार आहे. दरम्यान, प्राधिकरणने जोतिबा-पन्हाळा व राशिवडे मार्गालाही मंजुरी दिली असल्याने केएमटी आता जोतिबा-पन्हाळ्यालाही धावणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विशेष निमंत्रित असलेले महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांच्या बैठकीत वाढीवर शिक्‍कामोर्तब झाले. 

केएमटीचे सध्याचे दर व कंसात नवीन दर - पहिला टप्पा - 7 रु. (8 रु.), दुसरा टप्पा - 8 रु. (8 रु.), तिसरा टप्पा - 10 रु. (10 रु.), चौथा टप्पा - 11 रु. (12 रु.), पाचवा टप्पा - 12 रु. (14 रु.), सहावा टप्पा - 14 रु. (16 रु.), सातवा टप्पा - 16 रु. (18 रु.), आठवा टप्पा - 18 रु. (20 रु.), नववा टप्पा - 19 रु. (22 रु.), दहावा टप्पा - 20 रु. (24 रु.), अकरावा टप्पा - 21 रु. (26 रु.). 

केएमटीला गृह विभागाकडून 2 कोटी

राज्याच्या गृह विभागाकडून केएमटीला 2 कोटी 19 लाख 83 हजार 644 रु. मिळाले आहेत. केएमटीच्या बसेसमधून पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी कर्तव्यार्थ केलेल्या प्रवासाच्या भाड्यापोटीची ही रक्‍कम आहे. यासाठी अधिवेशनात तारांकीत प्रश्‍न उपस्थित केला होता. आता केएमटीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे आमदार अमल महाडिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

उत्तम पोवार निलंबित

महापालिकेतील प्रभारी आरोग्य निरीक्षक उत्तम बाळासो पोवार यांना गुरुवारी सेवेतून निलंबित करण्यात आले. पोवार यांनी हॉकी स्टेडियमजवळील एका हॉटेलचे ड्रेनेज लाईन जोडण्यासाठी महापालिका यंत्रणेचा गैरवापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.