Thu, Jul 02, 2020 18:35होमपेज › Kolhapur › स्वयंअर्थसहाय्यित ९०० शाळांना परवानगी

स्वयंअर्थसहाय्यित ९०० शाळांना परवानगी

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:13AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रवीण मस्के

कोल्हापूर विभागात दोन वर्षांत नवीन व दर्जा वाढ करणार्‍या सुमारे 900 हून अधिक शाळांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सरकारी शाळा कशा टिकणार हा प्रश्‍न आहे. 

संस्था अधिनियम 1860 तरततुदी नुसार धर्मादायकडे नोंदणीकृत संस्था व 1950 च्या महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियमानुसार पूर्वी शाळा सुरू करता येत होती. कायद्याच्या नव्या तरतुदीने शाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत न्यास, नोंदणीकृत संस्थांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करता येणार आहे. ‘आरटीई’ नुसार पूर्वी शाळा सुरू करण्यासाठी एक एकर जागेची अट होती.

महानगरपालिका व ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात नवीन शाळेसाठी 500 चौ. मी. जमिनीचे क्षेत्रफळ आवश्यक आहे. उर्वरित सर्व क्षेत्रांमध्ये किमान एक एकर जमिनीचे क्षेत्रफळ गरजेचे असल्याची दुरुस्ती नव्या विधेयकात करण्यात आली आहे. कोल्हापूर विभागात 2016-17 मध्ये मराठी माध्यमांच्या 277 व इंग्रजी माध्यमांच्या सर्वाधिक 326 शाळांना परवानगी मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 129 इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. खासगी कंपन्यांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये दर्जेदार मिळेल. मात्र, खासगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शिक्षण क्षेत्रातून तीव्र विरोध

खासगी क्षेत्रातील कंपन्यांना शाळा सुरू करण्यासाठी मुभा देणार्‍या महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) कायदा सुधारणा विधेयकास शिक्षण क्षेत्रातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 2 किलोपर्यंतची पॅकेट, पिकअप सुविधा, भरपाई, अधिक प्रमाणात बुकिंगसाठी सवलत ही या सेवेची वैशिष्ट्ये आहेत.