कोल्हापूर : प्रतिनिधी
जगातील पाचव्या क्रमांकाचे ज्वेलरी रिटेलर असलेले मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या 215 व्या शोरूमचे उद्घाटन रविवारी कोल्हापुरात बॉलीवूड स्टार अनिल कपूर यांच्या हस्ते झाले. यावेळी मलाबार गोल्डच्या इंडिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक ओ. आशेर, रिजनल हेड एम. पी. सुबेर, फंझीम अहमद, आनंद, रिजनल मॅनेजर शाईन परवाझ, स्टोअर मॅनेजर आशिष महागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शोरूममध्ये पहिल्याच दिवशी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. सर्व वयोगटातील ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बनविण्यात आलेली सिग्नेचर ज्वेलरी हे मलाबार गोल्डचे खास वैशिष्ट्य आहे. रोजच्या वापरातील दागिने, पार्टीवेअर, लग्न समारंभासाठी परिचित असलेले ब्राईड्स ऑफ इंडिया कलेक्शनचे विशेष दागिने उपलब्ध आहेत.तसेच 18 कॅरेटचे लाईटवेट अशी विविध प्रकारची ज्वेलरी शोरूममध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर माईन, एरा, एथनिक्स, डिव्हाईन, स्टारलेट, प्रेशिया या उपब्रँडची उत्पादनेदेखील आहेत.
येथील सोन्याच्या दागिन्यांना बीआयएस हॉलमार्क, हिर्यांसाठी आयजीआय आणि जीआयए ही मानांकने तर प्लॅटिनम ज्वेलरीसाठी पीजीआय मानांकन आहे. प्रत्येक दागिन्यावर संपूर्ण माहितीचे प्राईस टॅग, बायबॅकची हमी, दागिन्यांची कायमस्वरूपी देखभाल आणि एक वर्षाचा इन्श्युरन्स हे मलाबार गोल्डचे खास वैशिष्ट्य मानले जाते. प्रत्येक प्रांत आणि स्थानिक ग्राहकांच्या गरजा आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या उत्पादन केंद्रामध्ये दागिने घडविले जातात. सध्या तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल याशिवाय सौदी अरेबिया, कतार येथे उत्पादन केंद्रे आहेत. तसेच नऊ देशांत एकूण 215 शोरूम आहेत.