Tue, Jun 15, 2021 13:26
पायी वारीला बंदी घालण्‍यापेक्षा नियम पाळत दिंडी काढण्‍यास परवानगी द्यावी : चंद्रकांत पाटील 

Last Updated: Jun 12 2021 2:44AM

चंद्रकांत पाटील 
कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूरच्‍या पायी वारीवर बंदी घालण्‍यापेक्षा कोरोनाचे नियम पाळत दिंडी काढण्‍यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

याच बरोबर त्यांनी 'राज्‍यात कोरोनामुळे एक लाख नागरिकांचा मृत्‍यू झाला. देशाच्‍या तुलनेत मृत्‍यूचे हे प्रमाण ३३ टक्‍के आहे. हे गंभीर आहे. त्‍यामुळे लपविलेले अकरा हजार मृत्‍यू वेगळाच विषय आहे. त्‍यामुळे पाठ थोपटवून घेताना सरकारने राज्‍याची ही दूरवस्‍था कशामुळे निर्माण झाली. आपण कुठे कमी पडलो. याचे आत्‍मपरीक्षण सरकारने केले पाहिजे.' असे म्हणत सरकारवर कोरोना मृत्यू लपवल्याचा आरोप केला.

कोरोनाच्‍या पहिल्‍या आणि दुसर्‍या लाटकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. यातून सरकारचा बेफिकीरपणा दिसतो आहे. कोणत्‍याही विषयाची तयारी केली नाही. महाराष्ट्रातील मुंबईबरोबरचे शहर म्‍हणून पुण्‍याकडे पाहिले जाते. परंतू सरकारने त्‍याला १० कोटी देखील दिले नाही. उलट पुणे महापालिकेने पहिल्‍या लाटेत ३५० व दुसर्‍या २०० कोटी रुपये खर्च केले. कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने निधी खर्च केला. सरकारने काय केले? यावर अधिवेशनात आवाज उठविण्‍यात येईल. परंतू अधिवेशन देखील कोरोनाचे कारण सांगून दोन दिवसात संपवतील. त्‍यामुळे कोरोना काळात केलेल्‍या खर्चाची श्‍वेत पत्रिका सरकारने प्रसिद्ध करावी.' अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

वाचा : नितीन गडकरींचे नाव सांगून सोनाराला गंडा  

वाचा : नितीन गडकरींचे नाव सांगून सोनाराला गंडा  

वाचा : नितीन गडकरींचे नाव सांगून सोनाराला गंडा