Wed, Sep 23, 2020 07:54होमपेज › Kolhapur › अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

Last Updated: Aug 08 2020 1:29AM
विजापूर ः पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र  व कर्नाटकातील कृष्णा नदी पात्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणाचे सर्व26 दरवाजे उघडून 1 लाख 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

गुरुवारी सायंकाळपर्यंत 1 लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी धरणात येत होते. तर आज शुक्रवारी दुपारी त्यात वाढ होऊन 1 लाख 47 हजार 715 क्युसेक्स पाण्याचा आवक असल्यामुळे दुपारपासून 1 लाख 18 हजार क्युसेक्स पाणी तर वीजनिर्मिती केंद्राद्वारे 32 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. 519. 60 मीटर उंचीच्या अलमट्टी धरणाची 123 टीएमसी पाणी संग्रह करण्याची क्षमता आहे. या धरणाचे सर्व दरवाजे बंद केले असते तर आज धरण पूर्णपणे भरले असते. आज धरणात 97. 138 टीएमसी साठा असून 517.76 मीटरपर्यंत पाणी संग्रह करण्यात आले आहे. अलमट्टी जलशायच्या उजव्या बाजूस सहा वीजनिर्मिती केंद्रांद्वारे  215 मेगावॅट वीज उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती वीज निर्मिती केंद्राच्या अभियंत्यांनी दिली आहे.    

 "