Sat, Aug 08, 2020 03:31होमपेज › Kolhapur › अजिंक्य रहाणेच्या वडिलांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस

अजिंक्य रहाणेच्या वडिलांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 1:45AM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

क्रिकेटपटू अजिक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे यांच्या कारला धडकून एका वृद्धेचा मृत्यू झाल्या प्रकरणी कागल पोलिसांनी रहाणे यांना सी.आर.पी.सी.41, 1, अ प्रमाणे नोटीस दिली आहे त्याप्रमाणे रहाणे शुक्रवारी दुपारी कागल पोलिसांत हजर राहिले त्याचा जबाब नोंदविण्यात आला आणि दोषारोप पत्रासह न्यायालयात हजर राहण्याबाबतची नोटीस देण्यात आली.

मधुकर रहाणे आपल्या आय 20 एम. एच. 03 - सीबी 2021 या कारने आपल्या कुटुंबासह मुंबई येथील मुलुंड पश्‍चिमहून तारकर्ली येथे पर्यटनसाठी जात असताना कागल बसस्थानका शेजारील जोड पुलाजवळ चौपदरी महामार्ग ओलांडून जात असणार्‍या लक्ष्मीबाई दादासाहेब कांबळे या वृद्ध महिलेस धडक दिली. या धडकेत लक्ष्मीबाई या गंभीर जखमी झाल्या त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी मधुकर रहाणे कागल पोलिसांत हजर झाले त्याचा यावेळी जबाब नोंदविण्यात आला तसेच त्यांच्या कारची आर.टी. ओ.कडून तपासणी करण्यात आली रहाणे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत होती. मात्र, पोलिसांनी नोटीस देण्याची कार्यवाही केली.