Sat, Feb 29, 2020 13:35होमपेज › Kolhapur › आता ‘सर्व शिक्षा’ऐवजी ‘समग्र शिक्षा’ अभियान

आता ‘सर्व शिक्षा’ऐवजी ‘समग्र शिक्षा’ अभियान

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 12:25AMकागल : बा. ल. वंदूरकर

राज्य शासन आता यापुढे ‘सर्व शिक्षा’ अभियानऐवजी ‘समग्र शिक्षा’ अभियान राबविणार असून, त्यानुसार शासनाने 2018 -19 या शैक्षणिक सत्रापासून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रीकरण करून ‘समग्र शिक्षा’ अभियान योजनेची निर्मिती केली आहे. हे अभियान पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलांसाठी सुरू करण्यात आले असून, या समग्र शिक्षा अभियान योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.

गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, दिव्यांग बालकांसाठी विविध शैक्षणिक सोयीसुविधा, बालकांसाठी शैक्षणिक साहित्य, व्यावसायिक शिक्षण, डिजिटल शिक्षण इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. त्याचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी व त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्याकरिता विशिष्ट प्रकारच्या प्रणालीमध्ये माहिती अद्ययावत करण्यात येत आहे.केंद्रातील सर्व शाळांची माहिती प्रणालीतून डाऊनलोड करून मुख्याध्यापकांनी ती उपलब्ध करून घेऊन तपासून गटस्तरावर अपलोड करण्यासाठी गट समन्वयक शहर साधन केंद्र यांच्याकडे उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. समग्र शिक्षा अभियान योजना भारत सरकारकडे दि. 1 मे 2018 पर्यंत सादर करावी लागणार आहे. यामध्ये विलंब झाल्यास व त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी तरतूद मंजूर न झाल्यास त्याची जबाबदारी शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्यावर राहणार आहे.यापुढे सर्व शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण योजनेचे एकत्रीकरण करण्यात येऊन शिक्षणाला गती दिली देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहणार आहे.

Tags : Kolhapur, Addition, digital, education, system