Wed, Sep 23, 2020 01:21होमपेज › Kolhapur › ई-पास देणार्‍या दोन एजंटांवर कारवाई

ई-पास देणार्‍या दोन एजंटांवर कारवाई

Last Updated: Jul 03 2020 12:45AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

भरमसाट पैसे घेऊन जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आवश्यक ई-पास काढून देणार्‍या दोघा एजंटांवर कारवाई करण्यात येणार आहे. शिये (ता.करवीर) येथील हे दोघेजण असून स्टेशनरी दुकानातून हे नागरिकांकडून ई-पास देण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये घेत होते. 

ही माहिती मिळाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे आणि करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी संबंधितांना जिल्हाधिकारी कार्यालयात  बोलावून  चौकशी केली. यावेळी त्यांनी पैसे घेऊन ई -पास देत असल्याची कबुली दिली. या दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी पैसे देऊन ई-पास देणार्‍या एका झेरॉक्स सेंटर चालकाला मदत केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनाला निलबिंत करण्यात आले.

 "