Fri, Oct 30, 2020 19:33होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कुरुंदवाड येथे उपोषण सुरु 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कुरुंदवाड येथे उपोषण सुरु 

Last Updated: Sep 18 2020 1:54PM

मराठा आरक्षणासाठी कुरुंदवाड येथे बसलेले कार्यकर्तेकुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

सकल मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घटनापीठाकडे वर्ग झालेल्या याचिकेला महाराष्ट्र राज्य शासनाने भक्कम बाजू मांडावी आणि आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी यासाठी कुरुंदवाड येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरूवात झाली. यासंदर्भात कुरुंदवाड पालिका सभागृहाचा ठराव सहमत करून शासनाकडे पाठवू, अशी स्पष्ट ग्वाही नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी यावेळी दिली.

अधिक वाचा : पेट्रोल- डिझेल दरात आणखी कपात

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी कुरुंदवाड शहर समस्त सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोशल डिस्टन्स राखत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. 

अधिक वाचा : मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या निवासस्थानासमोर निदर्शने

माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, बी. बी सूर्यवंशी, तुकाराम पवार, अनिल पोवार, विजय मोगणे, विजय चव्हाण, प्रताप चव्हाण, संदीप अडसूळ, संजय चव्हाण, दिलीप घोरपडे, महादेव शिंदे, विठ्ठल पोवार, सुरेश तावदारे, मिलिंद गोरे, रामचंद्र सूर्यवंशी, प्रा.सुनील चव्हाण, जितेंद्र साळुंखे, प्रफुल्ल पाटीलसह आदी आंदोलक यावेळी सहभागी झाले होते.
 

 "