Wed, Jul 15, 2020 13:10होमपेज › Kolhapur › कोयनेतून २१००, राधानगरीतून ८०० क्युसेक विसर्ग सुरु

कोयनेतून २१००, राधानगरीतून ८०० क्युसेक विसर्ग सुरु

Last Updated: Jun 02 2020 11:00AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने आज ( दि. २ ) दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील राधानगरी धरणात ३८.९५ दश लक्ष घन मीटर पाणीसाठा आहे. धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणामधून आज सकाळी ७ वाजता २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.  

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 46.66 दलघमी, वारणा 324.35 दलघमी, दूधगंगा 212.58 दलघमी, कासारी 21.38 दलघमी, कडवी 30.20 दलघमी, कुंभी 27.05 दलघमी, पाटगाव 22.70 दलघमी, चिकोत्रा 13.87 दलघमी, चित्री 13.05 दलघमी, जंगमहट्टी 9.21 दलघमी, घटप्रभा  14.56 दलघमी, जांबरे 6.06 दलघमी, कोदे (ल पा) 1.380 दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.8 फूट, सुर्वे 12.6 फूट, रुई 38 फूट, तेरवाड 32 फूट, शिरोळ 26.3 फूट, नृसिंहवाडी 18 फूट, राजापूर 11.6 फूट तर नजीकच्या सांगली 5 फूट व अंकली 5.7  फूट अशी आहे.