Thu, Aug 06, 2020 04:38होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात ६२ रुग्णांची भर

कोल्हापूर जिल्ह्यात ६२ रुग्णांची भर

Last Updated: Aug 01 2020 4:13PM

प्रातिनिधीक फोटोकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी आलेल्या अहवालात ६२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाची संख्या कमी झाली होती. पण आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण आढळत आहेत. 

वाचा : शिरोळात कोरोनाने एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत १६६ नवे रुग्ण आढळून आले होते. रुग्णसंख्या काहीशी कमी झाली असली तरी मृत्यू संख्या कमी होत नसल्याचेच चित्र आजही कायम राहिले. काल दिवसभरात शहरातील ९ जणांसह १७ जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६,२७४ तर मृत्यूंची संख्या १८६ इतकी झाली. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी एका उपजिल्हाधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाली. दिवसभरात २०२ जण कोरोनामुक्‍तही झाले.

वाचा : 'दूध दर प्रश्नी १५ दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या फोडू'