Thu, Feb 27, 2020 21:37होमपेज › Kolhapur › १६,८९९ हेक्टर क्षेत्र बाधित

जिल्ह्यात अतिवृष्टीचा ५२८ गावांना फटका

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 11:08PMकोल्हापूर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत धुवाँधार पाऊस कोसळला. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील विशेषत: गगनबावडा, करवीर, राधानगरी, पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे व फळबागांच्या झालेल्या नुकसानीचा नजर अंदाज अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 528 गावांत अंदाजे 16 हजार 899 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये 13 हजार 347 हेक्टर्स उसाचे व 2 हजार 872 हेक्टर्स भाताचे क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार

जिल्ह्यात पिकांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने त्याची झळ हजारो शेतकर्‍यांना बसणार आहे. बाधित क्षेत्रामध्ये यंदा 1 लाख 42 हजार 336 हेक्टर्स उसाचे, तर 1 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्र भाताचे आहे. उसामध्ये 9 हजार 171 हेक्टर्स आडसाल, 35 हजार 855 हेक्टर्स पूर्वहंगामी उसाचे क्षेत्र आहे. यातील नदी व ओढ्यांच्या काठावरील म्हणजे वतातील सुमारे 25 हजार हेक्टर्स क्षेत्र पाण्याखाली गेले होते. सुमारे महिनाभर ऊस पाण्यात बुडालेले होते. पानांना प्रकाशच मिळाला नाही. उसाच्या सुरळीत (शेंड्यात) पाच दिवसांपेक्षा अधिक काळ गाळमिश्रित पाणी राहिले तर सुरळीतील जीव जाऊन उसाला तुसे फुटतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. इथे तर महिनाभर ऊस पाण्यात होता.

एकूण 528 गावे बाधित

करवीर (34), कागल (38), राधानगरी (72), गगनबावडा (42), पन्हाळा (25), शाहूवाडी (79), हातकणंगले (08), शिरोळ (00), गडहिंग्लज (12), आजरा (30), भुदरगड (80), चंदगड (108) एकूण बाधित गावे (528).

राधानगरी, गगनबावडा, चंदगड व करवीरमध्ये विक्रमी क्षेत्र बाधित झाले आहे. तालुकानिहाय, विविध पिकांखालील बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे. (कंसात बाधित क्षेत्र हेक्टर्समध्ये) करवीर : ऊस (1012), भात (126), भुईमूग (60), सोयाबीन (68). कागल : ऊस (222), भात (162), भुईमूग (13), सोयाबीन (30), नाचणी (1), भाजीपाला (2). राधानगरी : ऊस (7000), भात (2000). गगनबावडा : ऊस (2000), भात (150), भुईमूग (15), नाचणी (25). पन्हाळा : ऊस (78), भात (97) एकूण 175. शाहूवाडी : ऊस (430), भात (106), भुईमूग (94). हातकणंगले : ऊस (25), भात (1), भुईमूग (9), सोयाबीन (15). शिरोळ : नुकसान नाही. गडहिंग्लज : ऊस (5), भात (10), भुईमूग (15), सोयाबीन (20). आजरा : ऊस (480). भुदरगड : ऊस (436.64), भात (201), भुईमूग (4.50), सोयाबीन (7), नाचणी (4.50). चंदगड : ऊस (1659), भात (11), रताळी (76), भुईमूग (221). एकूण बाधित क्षेत्र : ऊस (13347.64), भात (2872), रताळी (76), भुईमूग (431.50), सोयाबीन (140), नाचणी (30.5), भाजीपाला (2).