Wed, Aug 12, 2020 20:37होमपेज › Kolhapur › दिवसभरात 450 घरांचा सर्व्हे

दिवसभरात 450 घरांचा सर्व्हे

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेच्या वतीने शहरात वीस जूनपासून युद्धपातळीवर डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पथकाने रविवारी लक्ष्मीपुरी, रविवारपेठ, गंजी गल्ली, शिवाजी पार्क, कावळा नाका शाहूपुरी, न्यू शाहूपुरी आदी परिसरातील जवळपास 1200 घरांची पाहणी केली. यापैकी 30 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. डेंग्यूच्या डासांची वाढती समस्या महापालिकेची डोकेदुखीच झाली आहे. युद्धपातळीवर डेंग्यू डास प्रतिबंधासाठी प्रयत्न सुरू आहेत. रविवारपासून डेंग्यू शोध मोहिमेत व्हाईट आर्मीचे महिला पथक सहभागी झाले आहे. 

नागरिकांमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती करण्याकरिता 250 प्रमुख ठिकाणी बोर्ड लावण्यात आले आहेत. ज्या नागरिकांचे इमारत व मिळकतीमध्ये पाणी साचले आहे, अशा 30 हून अधिक जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रविवारी महापालिकेचे जवळपास शंभर कर्मचारी पथकामध्ये सहभागी होते.डेंग्यूचा विळखा घट्ट होऊ लागल्याने महापालिकेच्या मदतीला व्हाईट आर्मीचे महिला पथक धावले आहे. 

450 हून अधिक घरात जाऊन व्हाईट आर्मीच्या महिला जवानांनी रविवारी डेंग्यूचा सर्व्हे केला. यामध्ये 150 ठिकाणी डेंग्यू डासांशी साम्य असणार्‍या अळ्या सापडल्या.  यामध्ये प्रतिभा गडकरी, गौरी गायकवाड, माधुरी पाटील, अनिता लोळगे, ऋतूजा पाटील, अमृता मेढे, समृध्दी सातार्डेकर, प्रणाली राऊत, पियांका पाटील, स्नेहल निकम यांचा सहभाग आहे. या महिला न्यू कॉलेज व एस.एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजच्या आहेत. डेंग्यूची साथ आटोक्यात येईतोपर्यंत व्हाईट आर्मीचे पथक मदत व जनजागृती करणार आहे. मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडेे, विभागीय निरीक्षक तानाजी पाडळकर, मनोज लोट, करण लाटवडेकर, प्रशांत शेंडे, उज्वल नागेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईट आर्मीचे पथक जनजागृती करत आहे.