Fri, Sep 18, 2020 14:00होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात 445 बाधित, दिवसात 12 मृत्यू; शहरात 160 रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात 445 बाधित, दिवसात 12 मृत्यू; शहरात 160 रुग्ण

Last Updated: Aug 06 2020 1:21AM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात आणखी 445 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर बाराजणांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 237 वर गेली आहे. लॉकडाऊन तसेच विविध उपाययोजना करूनही बाधितांची संख्या वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनही संभ्रमात पडले आहे. दरम्यान, सीपीआरमधील आणखी एका डॉक्टरचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये इचलकरंजी 5, हातकणंगले 5, जयसिंगपूर 1 आणि कोल्हापूर शहरातील एका व्यक्‍तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण 8 हजार 688 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 3 हजार 611 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. आजअखेर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 5,077 इतकी आहे.

कोल्हापूर शहरात बुधवारी 160 कोरोनाबाधित आढळून आले. शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 

सकाळी दहा वाजता इचलकरंजी येथील तिरंगा चौक, सांगली नाका रामनगर व लोकमान्यनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला. दुपारी बारा वाजता 17 नवीन रुग्णांची भर पडली. करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी व बालिंगा येथील प्रत्येकी 1, हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील 1, पन्हाळा तालुक्यातील 1 व कोल्हापूर शहरातील शाहूपुरी 1, शिवाजी पार्क 1, विक्रमनगर 1, राजलक्ष्मी कॉलनी 1, प्रतिभानगर 1, कदमवाडी 2, संभाजीनगर 1, बेलबाग येथील 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दुपारी 1 वाजता शहरातील रुग्णांच्या संख्येत पुन्हा 22 ने वाढ झाली. यामध्ये हातकणंगले 6, करवीर 7, शाहूवाडी 2, राधानगरी 2, पन्हाळा 1 व शहरात 22 रुग्ण वाढले. दुपारी 2 वाजता आणखी 94 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये शिरोळ 39, कोल्हापूर शहर 9, हातकणंगले 3, गगनबावडा 9 व भुदरगड येथे 34 जण कोरोनाबाधित आढळले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण प्राप्‍त 445 पॉझिटिव्ह अहवालांमध्ये आजरा 16, भुदरगड 35, चंदगड 12, गडहिंग्लज 7, गगनबावडा 12, हातकणंगले 70, कागल 1, करवीर 61, पन्हाळा 12, राधानगरी 47, शाहूवाडी 46, शिरोळ 45, नगरपालिका क्षेत्र 140, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 160 व इतर जिल्हा व राज्यातील 10 रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी सायंकाळी 5 ते बुधवारी सायंकाळी 5 पर्यंत 1,197 प्राप्‍त अहवालांपैकी 329 निगेटिव्ह, तर 614 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 96 अहवाल प्रलंबित आहेत. 43 जणांचा दुसराही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 14 जणांचे स्वॅब नाकारण्यात आले आहेत. अँटिजेन चाचणीच्या 144 अहवालांपैकी 106 निगेटिव्ह, 38 पॉझिटिव्ह, खासगी रुग्णालये तसेच लॅबमधील 50 पॉझिटिव्ह, तर 19 निगेटिव्ह अहवाल आरटी-पीसीआरला पाठविण्यात आले. 
5 हजार 77 रुग्णांवर उपचार

जिल्ह्यात आजअखेर एकूण 8,688 पॉझिटिव्हपैकी 3,611 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 5,077 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. बुधवारअखेर जिल्ह्यातील तालुका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : आजरा 186, भुदरगड 244, चंदगड 402, गडहिंग्लज 274, गगनबावडा 28, हातकणंगले 778, कागल 153, करवीर 903, पन्हाळा 331, राधानगरी 296, शाहूवाडी 324, शिरोळ 342, नगरपरिषद क्षेत्र 1,697, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 2,343 असे एकूण 8,301 आणि इतर जिल्हा व राज्यातील 115 असे मिळून एकूण 8,688 रुग्णांची संख्या झाली आहे.

 "