होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : भुदरगड तालुक्याला कोरोनाचा धक्का; ४ नवे रुग्ण

कोल्हापूर : भुदरगड तालुक्याला कोरोनाचा धक्का

Last Updated: May 21 2020 5:12PM

संग्रहित छायाचित्रगारगोटी (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

भुदरगड तालुक्यात आज पुन्हा चार नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली असून तालुक्याच्या खात्यावरील रुग्णांचा आकडा २२ वर पोहोचला आहे.

वेंगरूळ, आरळगुंडी आणि वासनोली या गावात तब्बल आठ रुग्ण एकाच दिवशी सापडल्यामुळे भुदरगड तालुका हादरला होता. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच पुन्हा चार रुग्ण सापडले आहेत. मुंबई येथून कूर येथे आलेल्या व शाळेत क्वारंटाईन केलेल्या ३० वर्षे व ६५ वर्षे वयाच्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. पाटगाव शिवाजीनगर येथे ३६ वर्षीय पुरुषाचा, तर वासनोली येथील ३४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी वासनोली येथील आठ वर्षाच्या बालकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.