Sun, Oct 25, 2020 07:02होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात 354 कोरोना रुग्ण; 6 मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात 354 कोरोना रुग्ण; 6 मृत्यू

Last Updated: Aug 07 2020 1:11AM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना रुग्णांचे स्वॅब तपासणी करणारे किट संपल्याने सीपीआरमधील स्वॅब तपासणी अद्याप बंदच आहे. अन्य लॅबमधून तपासण्यात आलेल्या प्राप्‍त अहवालांनुसार जिल्ह्यात गुरुवारी 354 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. दहा वर्षांच्या आतील 18 मुलांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषदेतील एका उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 243 वर गेली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8,770 इतकी झाली असून, 3 हजार 768 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 4 हजार 767 इतकी झाली आहे.

गुरुवारी सायंकाळी प्राप्‍त 581 अहवालांपैकी 507 निगेटिव्ह, तर 69 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 5 अहवाल नाकारण्यात आले आहेत. अँटिजेन टेस्टिंग चाचणीच्या 658 प्राप्‍त अहवालांपैकी 536 निगेटिव्ह, तर 75 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी रुग्णालये, लॅबमधील 210 पॉझिटिव्ह, तर 32 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. आरटी- पीसीआरला पाठविण्यात आलेले  एकूण 354 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 8,770 पॉझिटिव्हपैकी 3,768 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात उपचार सुरू असणारे एकूण 4,767 रुग्ण आहेत.

एकूण प्राप्‍त 354 पॉझिटिव्ह अहवालांपैकी कोल्हापूर शहरातील बाधितांची संख्या 152 वर गेली आहे. तर आजरा 3, चंदगड 3, गडहिंग्लज 2, गगनबावडा 1, हातकणंगले 16, कागल 5, करवीर 46, पन्हाळा 1, राधानगरी 1, शाहूवाडी 1, शिरोळ  तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रातील 100 जणांचा सामवेश आहे. नगरपरिषद क्षेत्रातील 1,797, कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील 2,495 असे एकूण 8,632 आणि इतर जिल्हा व राज्यातील 138 असे मिळून एकूण 8,770 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण 8,770 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 3,768 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

तर एकूण 243 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 4,767 इतकी आहे. गुरुवारी 157 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बुधवारी रात्री बारानंतर 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये हातकणंगले 3, करवीर 1 व कोल्हापूर शहरातील सातजणांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शंभरने भर पडली. यात हातकणंगले 37, करवीर 14, कोल्हापूर शहर 39, पन्हाळा 1, राधानगरी 1, कागल 5, शिरोळमधून 2 जणांचा समावेश आहे. दुपारी 12 वाजता मिळालेल्या अहवालात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तपासणी किट संपल्याने  अहवाल रखडले

सीपीआरमध्ये कोरोना स्वॅबची तपासणी करणारे ‘आरएनए’ (रायबोज  न्युक्‍लिक अ‍ॅसिड) एक्स्ट्रॅक्शन किट संपले आहेत. त्यामुळे हजारो स्वॅब तपासणीविना तसेच पडून आहेत. जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजारांहून अधिक स्वॅब तपासले जातात. गेल्या सहा दिवसांपासून हे किट संपले आहेत. त्यामुळे किमान पाच ते सहा हजार जणांचे अहवाल प्रलंबित असण्याची शक्यता आहे. अद्याप हे किट उपलब्ध झाले नसल्याने रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून, त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. नेमका उपचार कोणता करायचा, याबाबत डॉक्टरही संभ—मात आहेत. किट उपलब्ध झाल्यानंतर स्वॅब तपासणी होऊन रुग्णांचे अहवाल झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

 "