Sun, Oct 25, 2020 08:34होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : २९ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर : २९ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Aug 03 2020 10:23AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने सात हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज २९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यात पन्हाळा येथील १, करवीर ४, भुदरगड १, कागल ६, केएमसी ६, हातकणंगले ८, गगनबावडा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

काल दि. २ रोजी जिल्ह्यात दिवसभरात १३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २०७ इतकी झाली आहे. जिल्ह्यात काल ५५२ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या सात हजारांवर पोहोचली होती. रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात हे रुग्ण आढळून आले होते.

काल दिवसभरात २०५ जणांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्‍त झालेल्यांची जिल्ह्यातील संख्या ३,०६७ वर गेली. 

 "