Wed, Aug 12, 2020 12:56होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात 285 नवे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात 285 नवे रुग्ण

Last Updated: Aug 02 2020 1:27AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

नगरसेवक संतोष गायकवाड (वय 42) यांचा शनिवारी सायंकाळी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत होता. मात्र, त्यांचा स्वॅब घेतला नाही, यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाने आठजणांचा मृत्यू झाला.

मर्यादित किटमुळे आजही चाचण्यांची संख्या मर्यादित राहिली. दिवसभरात नवे 285 रुग्ण वाढले. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 611 इतकी झाली, तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 194 इतकी झाली. 

वरिष्ठ अधिकार्‍यांनाही लागण

इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागातील उपनगर रचनाकार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.भाजपचे नगरसेवक असलेले संतोष गायकवाड संभाजीनगर परिसराचे प्रतिनिधित्व करत होते. गायकवाड यांच्या राजाराम चौकातील महिला नातेवाईकाचा काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. यानंतर राजाराम चौक आणि गायकवाड राहत असलेल्या वारे वसाहत परिसरात कोरोनाचा उद्रेक झाला. गायकवाड यांच्या वडिलांचा दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

दरम्यान, आज सकाळपासून गायकवाड यांना श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. सकाळी त्यांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली, नंतर ते घरी आले. सायंकाळी त्यांना पुन्हा श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. नातेवाईक आणि कार्यकर्त्यांसह एका नगरसेवकाने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सीपीआरमध्ये आणल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, काही वेळातच उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

नव्याने आलेल्या आदेशानुसार, 

मृत व्यक्‍तीचा स्वॅब घेतले जात नाहीत. यामुळे गायकवाड यांचाही स्वॅब घेतला नसल्याचे राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तेजस्विनी सांगरूळकर यांनी सांगितले. यामुळे गायकवाड यांचा मृत्यू कोरोनाने झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. रात्री उशिरा पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गायकवाड यांचा मृत्यू झाल्याची समजतात कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला. खबरदारीचा उपाय म्हणून सीपीआर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वारे वसाहतीत ही माहिती समजताच सर्वत्र सन्नाटा पसरला.

आज दिवसभरात शहाजी वसाहत येथील 66 वर्षाच्या महिलेचा कोरोनाने खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.यादव नगर येथील 68 वर्षाच्या पुरुषाचा घरी तसेच गांधीनगर येथील 71 वर्षाच्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. सीपीआरमध्ये शिरोळ येथील 33 वर्षे पुरुषाचा तसेच कोल्हापुरातील 65 वर्ष पुरुषाचा आणि तर बेळगाव येथील 52 वर्षीय पुरुषाचा ही सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इचलकरंजी येथील शहापूर परिसरातील 50 वर्षाच्या पुरुषाचा तसेच मुरदुंडे मळ्यातील 60 वर्षाच्या पुरुषाचा आज इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

शहरात नवे 121 रुग्ण

जिल्ह्यात दिवसभरात 206 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 6 हजार 532 इतकी झाली. यामध्ये कोल्हापूर शहरात 121 रुग्णांची भर पडली मंगळवार पेठेतील एकाच कुटुंबातील आठ लोकांसह बेलबाग, कोष्टी गल्‍ली आदी परिसरासह बारा नवे रुग्ण आढळून आले. यासह योगेश्?वर कॉलनी, आर. के. नगर, ताराबाई पार्क, कणेरकरनगर, कसबा बावडा परिसरात आजही रुग्णांची वाढ झाली. पाचगावात एकाच कुटुंबातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. महावीर कॉलेजवळ, भक्‍ती पुजा नगर, निकम गल्‍ली बुधवार पेठ, सदर बाजार, जाधववाडी, कनाननगर, कळंबा, कुंभार गल्‍ली, राजारामपुरी, रामानंद नगर, जरग नगर, नाळे कॉलनी, फुलेवाडी, बोंद्रे नगर रिंगरोड, नवीन वाशी नाका, रंकाळा, गडकर कॉलनी, मोरे-माने नगर, शाहू नगर येथेही रुग्ण आढळले. शुक्रवारी मृत्यू झालेल्या पिवळा वाडा येथील पुरुषाची पत्नी, आई आणि मुलीचाही अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

करवीर तालुक्यात दिवसभरात 64 रुग्णांची भर पडली. गांधीनगर, कोपार्डे, वडणगे आदी गावात रुग्ण वाढले. हातकणंगले तालुक्यात 37 रुग्ण आढळले. त्यापैकी 21रुग्ण इचलकरंजी शहरातील होते. इचलकरंजीत जिव्हेश्वर मंदिर, रेदांळकर मळा, संभाजी चौक, सोलगे मळा, कामगार चाळ, इंदिरा कॉलनी, इंदिरा नगर, साळुंखे मळा, श्रीपाद नगर, गणेशनगर आदी ठिकाणी रु्ग्ण आढळले. शिरोळमध्ये चार,  गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यात प्रत्येकी तीन तर पन्हाळ्यात चार जण आढळून आले. गडहिंग्लज मध्ये प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली. कागल तालुक्यात सात नवे रुग्ण आढळले. कागल शहरातील शाहू हायस्कूल जवळील एकाच कुटुंबातील दोघांसह तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.दिवसभरात 126 जण कोरोना मुक्‍त झाले. त्यामुळे कोरोनातून पूर्ण बरी झालेल्यांची संख्या 2 हजार 862 इतकी झाली आहे.