Thu, Aug 13, 2020 17:12होमपेज › Kolhapur › आदमापूर भक्तनिवासमध्ये कोरोना केअर सेंटर

आदमापूर भक्तनिवासमध्ये कोरोना केअर सेंटर

Last Updated: Aug 02 2020 7:11PM

आदमापूर : येथील भक्त निवास मध्ये कोविड सेंटरची जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. सोबत प्रातांधिकारी संपत खिल्लारी, तहसिलदार अमोल कदम, रामभाऊ मगदुम. मुदाळतिट्टा (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा भक्तनिवासमध्ये कोविड सेंटर २ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले आहे. दोनशे बेडची सोय असणाऱ्या या कोरोना काळजी सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट देऊन कोवीड सेंटरची माहिती घेतली.

अधिक वाचा : कोल्हापूर : हुपरीत कोरोना २०० पार, २४ तासात २ मृत्यू  

सध्या या कोविड सेंटर मध्ये दोन महिला व दोन लहान मुले अशा चार जणांवर उपचार सुरू केले आहेत. जसे रुग्णांची संख्या वाढेल तशी या ठिकाणी रुग्ण दाखल केले जाणार आहेत. यासाठी आवश्यक असणारा डॉक्टर, नर्स, सेवक, कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. डॉ. अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड सेंटर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व यंत्रणेस सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. यावेळी  प्रातांधिकारी डॉ. संपत खिल्लारी, तहसिलदार अमोल कदम, बाळू मामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम, अध्यक्ष धैर्यशील भोसले, व्यवस्थापक अशोक पाटील आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : कोल्हापुरात दुपारपर्यंत कोरोनाचे द्विशतक; हातकणंगले हॉटस्पॉट