Fri, Nov 27, 2020 23:02होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात आज तब्बल ४८ बाधितांची भर

कोल्हापुरात आज तब्बल ४८ बाधितांची भर

Last Updated: Jul 12 2020 5:33PM
कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

जिल्ह्यात कोरोना कहर सुरुच असून आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये इचलकरंजीमधील १० जणांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात आज नव्याने ६ सापडले आहेत. शिरोळ तालुक्यातील एक, तर जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. दरम्यान सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पुन्हा १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

यामधील इचलकरंजीमध्ये १० बाधित रुग्णांची भर पडली आहे. गडहिंग्‍लज- शेंद्री, कानेवाडी, शांती प्रकाश कॉलनी व गडहिंग्‍लजमध्ये प्रत्‍येकी १, चंदगड-२, आजरा - आझाद चौक-२ करवीर- वळीवडे १ याठिकाणी कोरोनाबाधित आढळला आहे. तसेच कोल्‍हापूर शहरातील टिंबर मार्केटमधील राजाराम चौकात ४, राजोपध्येनगर १ तसेच मंगळवार पेठेत १ कोरोनाबाधित रूग्‍ण आढळला आहे. ताराबाई पार्क, कणेरी तसेच कसबा बावडा येथूनही रुग्णांची भर पडली आहे.