Fri, Jul 03, 2020 02:28होमपेज › Kolhapur › आजरा तालुक्यात एकाच दिवशी १६ कोरोनाग्रस्त

आजरा तालुक्यात एकाच दिवशी १६ कोरोनाग्रस्त

Last Updated: May 25 2020 2:50PM
आजरा : पुढारी वृत्तसेवा

आजरा तालुक्यात सोमवारी सकाळी आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने १६ जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळल्याने तालुक्याचा धोका वाढला असून शासकीय यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२ वर पोहचली असून खबरदारी म्हणून कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या गावांच्या सीमा सील करण्याच्या हालचाली तालुका प्रशासनाकडून सुरु झाल्या आहेत. 

वाचा: कोल्हापुरात तब्बल ३१ कोरोनाग्रस्त सापडले; बाधितांची चारशेकडे वाटचाल 

आतापर्यंत तालुक्यातील हारुर, बोलकेवाडी, हालेवाडी, श्रृंगारवाडी, भादवण, बेलेवाडी हु॥, झुलपेवाडी, किणे, आल्याचीवाडी आदी गावातील १६ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. यामध्ये सोमवारी नव्याने १६ जणांची भर पडली असून पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण हे मुंबईस्थित असल्याचे समजते.

वाचा: हातकणंगले : पुण्याहून आलेला युवक पॉझिटिव्ह; किणी गाव शुक्रवारपर्यंत बंद

एकाच दिवशी १६ जण पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यात भिती निर्माण झाली असून प्रशासनालाही हादरा बसला आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आज सोमवारी दुपारपर्यंत प्राप्त झालेले पॉझिटिव्ह अहवाल हे ग्रामीण भागातील व मुंबईहून आलेल्या व्यक्तींचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.