Wed, Sep 23, 2020 01:56होमपेज › Kolhapur › ‘140’ क्रमांकाबाबत घाबरू नका; कोल्हापूर सायबर सेलचे आवाहन

‘140’ क्रमांकाबाबत घाबरू नका; कोल्हापूर सायबर सेलचे आवाहन

Last Updated: Jul 11 2020 1:23AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मोबाईलवर 140 किंवा 104 क्रमांकाने सुरू होणारा फोन उचलल्यास तुमच्या खात्यातील पैसे जातात, असा मॅसेज व माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शुक्रवारी फिरत होता. ही माहिती गैरसमजातून पसरत असून, अशा क्रमांकाबाबत मोबाईलधारकांनी घाबरून जाऊ नये, असे कोल्हापूर सायबर सेलच्या वतीने सांगण्यात आले. 

स्वत:च्या बँक खात्याची माहिती, ओटीपी क्रमांक किंवा एटीएम, डेबिट कार्डमागील सीव्हीव्ही क्रमांक कोणाशीही शेअर करू नका, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केले.

 "