Mon, Aug 10, 2020 07:44होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात आणखी १८ बाधितांची भर

कोल्हापुरात आणखी १८ बाधितांची भर

Last Updated: Jul 07 2020 12:20AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. कोरोना ग्रस्तांच्या होणाऱ्या वाढीमुळे शहरासह जिल्ह्यातील  ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरत आहे. आज (दि. ६) जिल्ह्यात नवीन १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. इचलकरंजी : कलानगर, आभार फाटा चंदूर, वर्धमान कॉलनी, हत्ती चौक - ५, भुदरगड - मुदाळ १, गडहिंग्लज, हेब्बाळ, कुमारी प्रत्येकी १, आजरा - भादवण २, भादवणवाडी ३, चंदगड- शेणोळी : ३, शिरोळ : जयसिंगपूर १ या तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे.