Tue, Aug 04, 2020 13:48होमपेज › Kolhapur › 'कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न करा' 

'कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न करा' 

Last Updated: Jul 11 2020 3:00PM

पालक मंत्री सतेज पाटीलकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोरोनाचा समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच सतर्क राहून प्रयत्न करावेत. तसेच ट्रेसिंग झाल्या झाल्या संबंधितावर उपचार सुरू करा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (ता.११) दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक अधिकारी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला. 

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, सर्वांनीच आता सतर्क राहून खबरदारी घेण्याची गरज आहे. समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. लक्षणं दिसल्यावर उपचार सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी झालेल्या सर्वेक्षणाचा नियोजनासाठी वापर करा. सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी अधिक काळजी घ्यावी. मृत्यू रोखण्यासाठी ट्रेसिंग झाल्याबरोबर उपचार सुरू करा. व्याधीग्रस्त नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करा. 

या बैठकीस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, तहसिलदार अर्चना कापसे आदी उपस्थित होते.