मन की बात : रंजल्या जीवांची गांजल्या जीवांची, मनी धरी खंत, तोचि खरा महंत

Last Updated: Mar 18 2020 8:15PM
Responsive image

स्नेहल अवचट


पूर्वीच्या राजघराण्यात  राजवैद्यांना एक विशेष स्थान होते. महिला वर्गात अगदी अंत:पुरात जाण्याची मुभा त्यांना असायची, कारण एक आदर व विश्वास यावर ते नाते असायचे. आपल्या सर्व शारीरिक व मानसिक समस्यांची योग्यरित्या काळजी घेणारे एक महत्त्वाचे कौटुंबिक सभासद इतके महत्त्वाचे पद त्यांना मिळायचे. रुग्णाची योग्य ती शारीरिक व मानसिक काळजी घेणे, हा एक नोबल प्रोफेशनच आहे. राजघराणी संपुष्टात आली आणि आपली काळजी घेणारे ‘फॅमिली डॉक्टर’ ही जिव्हाळ्याची व्यक्ती  घरातील सानथोरांना अगदी जवळची वाटू लागली. प्रत्येक माणसाचे स्वभाव, राग, लोभ याची त्यांना रास्त जाणीव असायची. त्यामुळे आजाराबरोबरच नात्यात देखील कोणती रोगराई पसरू नये, याचीदेखील योग्य ती काळजी घेणे ही जणू त्यांची जबाबदारी असायची.

पुढे वैद्यकीय क्षेत्रात खूप शोध लागले. नवनवीन प्रयोग व औषधे यात नावीन्य आले, पण डॉक्टरांचा हा मानसिक दुवा काही डॉक्टरांकडून तसाच जोपासला गेला आहे व यापुढेदेखील जात  राहीलच. जरी काही पैशाच्या मागे लागणारे,  बोटावर मोजवे असे काही डॉक्टर असले तरी, काही मात्र समाजसेवेचे भान असणारे कित्येक धन्वंतरी ‘रुग्णसेवा’ हेच व्रत तळमळीने जपत आहेत!

त्यातीलच एक म्हणजे या क्षेत्रातील जणू  भीष्माचार्य म्हणजे आपले माननीय  ह. वि. सरदेसाई सर. नुकताच त्यांनी आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावून आपला राम राम घेतला. अतिशय आनंदी, उत्साही स्वभाव व प्रगत शास्त्राचा सातत्याने सखोल अभ्यास करून मानसशास्त्र व योगशास्त्र यांची जोड देऊन सर्व दिशांनी रुग्णांची मानसिकता जपणारे, सोप्या भाषेत प्रत्येकाला भावेल व समजेल, असा वैद्यकीय ज्ञानाचा प्रचार व प्रसार करणारे एक अनुभवी व्यक्तिमत्त्व होय. पहिल्याच भेटीत प्रत्येकाशी मनमोकळा संवाद साधून त्याचे गतआयुष्य व आजारांचे पैलू ऐकत त्याला बोलते करून, त्याच्या मनातले काढून घेणे, ज्यामुळे रोगाचे योग्य निदान होऊन पथ्य, व्यायाम व औषधे ही त्रिसूत्री हसत-खेळत रुग्ण आत्मसात करायचा.त्यानुसार योग्यवेळी प्रोत्साहन व कौतुक; यामुळे रुग्ण घेतला वसा टाकायचे नाहीत. हे श्रेय मात्र सरांचेच असायचे! यापुढेदेखील त्यांची सर्व मातब्बर डॉक्टरांची टीम हाच वसा पुढे चालू ठेवतील, यात तिळमात्र शंका नाहीच!

वेगवेगळ्या रूपातील गणेशमूर्ती जमविणे,  संवाद कौशल्यातून बुद्धिमत्तेची झळाळी दिसून येणार्‍या सरांना रुग्णांविषयीचा अपार उमाळा  होता. समोरच्या माणसाला कायम एक माणूस म्हणून आदराची वागणूक मिळायची. मृदू शब्दांत कानउघाडणी केली तरी त्यांच्याशी केलेल्या संवादाने रुग्ण निम्मा बरा होऊन जायचा. सहा दशकांहून अधिक काळ ही ‘मानवसेवा’ केलेला अवलिया पुन्हा होणे नाही, हेही तितकेच खरे.

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातुनी स्वस्ति पद्मे रेखिती!!

कोल्हापूर : 'या' गावात ग्रामपंचायत सदस्याकडून स्वच्छतेचा नवा आदर्श


ग्रामपंचायत निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणतात, 'भाजपचं अस्तित्व मर्यादित झालं आहे'


हृदयविकाराचे आजार : फारच महत्वाचं! कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक काय? 


गोव्याचे माजी मंत्री रमेश तडवकर यांची निर्दोष मुक्तता


शुभमन गिलनं सुनिल गावसकरांचं ५० वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड मोडलं!


मुंबईत डिझेलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर


'टोमॅटो एफएम'च्या 'फॅनक्लब काँटेस्ट'मध्ये सहभागी व्हा आणि बक्षिसं जिंका!


औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या गाडीवर दगडफेक


उस्मानाबाद : ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने माजी सैनिकांचा जागीच मृत्यू


मानसी नाईक अडकली लग्नबंधनात (video)