Thu, Jul 09, 2020 03:27होमपेज › Jalna › पाण्यासाठी संतप्त महिलांचा ग्रा.पं. कार्यालयावर हंडा मोर्चा

पाण्यासाठी संतप्त महिलांचा ग्रा.पं. कार्यालयावर हंडा मोर्चा

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:29PMबदनापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील माळेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कुठल्याची उपाय-योजना न केल्याने संतप्त झालेल्या महिलांना गुरुवारी (दि.26) सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पाण्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.

ग्रामपंचायतच्या ऩियोजनाअभावी महिलांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाणी नसल्याने महिलांना पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचयातीने दुर्लक्ष केल्याने  महिलांनी ग्रामपंयतीवर हंडा मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला.  तत्काळ पाण्याची व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिली. यावेळी सरस्वतीबाई गोरे, मंदाबाई काकडे, आहिल्या गोडसे, पार्वता माळी, शशिकला शेळके, अनिता बरडे, निर्मलाबाई गोरे, पुष्पाबाई काळे, चंद्रभागाबाई जावळे, बसवंंताबाई मेहरा, कडूबाई धोत्रे, मीनाबाई पवार आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

Tags : Jalna, womens, Front, drinking, water, question