Mon, Jul 06, 2020 08:48होमपेज › Jalna › बसस्थानकातील पाणपोई शोभेची वस्तू

बसस्थानकातील पाणपोई शोभेची वस्तू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जाफराबाद  : प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जाफराबाद बसस्थानक आगाराकडून बांधण्यात आलेल्या पाणपोईत पाणीच नसल्याने प्रवाशांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.  बसस्थानकाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशाना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

गेल्या आठवड्यापासून तालुक्यात तापमानाचा चांगला तापमानाचा पारा वाढला आहे. यामुळे प्रवाशी घामाघूम होत असून शरीराची लाहीलाही होत असताना प्रवाशांकडून पाण्याची मागणी होत आहे. मात्र जाफराबाद बसस्थानकात आगाराकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.  यामुळे प्रवाशाना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. सध्या लग्नसराई, यात्रा, सप्ताहांचे सर्वत्र कार्यक्रमामुळे बसस्थानकात प्रवाशांची प्रंचड गर्दी होत आहे, मात्र बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशाची पाण्यासाठीची भटकंती सुरू आहे. काही समाजसेवकांनी बसस्थानकाबाहेर पाणपोई सुरू केली आहे. त्यावरच  प्रवाशी तहान भागवीत आहे.  पाणपोईसाठी पाणी जास्त लागत असल्याने समाजसेवकांवरही  विकतचे पाणी घेऊन  पाणपोई सुरू ठेवण्याची वेळ आली आहे. 

तीन वर्षांपूर्वी आगाराच्या वतीने मोठा गाजा-वाजा करून पाणपोई उभारण्यात आली होती.  आजही पाणपोई शोभेची वस्तू बनली आहे.   तीन वर्षांअगोदर हजारो रुपये खर्च करुन प्रशासनाने बसस्थानकात पाणपोई उभी केली खरी, पंरतु त्यात पाणीच नसल्याने  ती पाणपोई बसस्थानकात उभी आहे. पाण्यासाठी प्रवाशांची होणारी भटकंती बघताना आगाराच्या वतीने प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र ती करण्यात न आल्याने प्रवाशी पाण्याच्या शोधार्थ फिरत आहेत.


  •