Tue, Jun 15, 2021 11:49
जालना : जाफराबाद-माहोरा रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Last Updated: May 27 2021 6:28PM

जाफराबाद : पुढारी वृत्तसेवा 

जाफराबाद ते माहोरा रस्त्यावरील चिंचखेडा फाट्याजवळ ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील मदन पाडुरंग शेजुळ (वय ३६) आणि व अनुष्का मदन शेजुळ (३) (दोघे रा. म्हसरुळ, ता. जाफराबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मदन यांची पत्नी मंदा शेजुळ व दुसरी मुलगी सृष्टी शेजुळ या दोघी गंभीर जखमी झाल्या. आज (दि. २७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरुळ येथील मदन शेजुळ हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान जाफराबाद ते माहोरा रस्त्यावरील चिंचखेडा व जानेफळ फाट्याजवळ त्यांची दूचाकी आली असता त्यांना सिमेंटची वाहतुक करणा-या ट्रकने धडक दिली. या अपघातात मदन शेजुळ व त्यांची ३ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू  झाला. तर गर्भवती पत्नी मंदा व ५ वर्षाची दुसरी मुलगी सृष्टी ह्या गंभीर जखमी झाल्या. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

या घटनेची माहिती समजताच जाफराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे, पोका गणेश पायघन, चालक श्री म्हस्के व होमगार्ड यांनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.