Mon, Jul 06, 2020 13:09होमपेज › Jalna › भरधाव ट्रकच्या धडकेत बैलजोडी ठार; एक जखमी

भरधाव ट्रकच्या धडकेत बैलजोडी ठार; एक जखमी

Published On: Mar 11 2019 10:43PM | Last Updated: Mar 11 2019 10:43PM
वडीगोद्री (जालना) : प्रतिनिधी

भरधाव ट्रकने उसाच्या बैल गाडीला धडक दिल्याने दोन बैल ठार झाले तर एक इसम जखमी झाला. ही घटना दि. ११ मार्च रोजी रात्री ८च्या दरम्यान औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील गोंदी फाट्यावर घडली.

शहागड जवळील गोंदी फाट्यावर औरंगाबादहून येणारी ट्रक क्रमांक एम एच २६ ए डी ३१४४ ने समर्थ कारखाना येथे ऊस घेऊन जाणाऱ्या बैल गाडीस जोराची धडक दिली. यामध्ये दोन बैल जागीच ठार झाले, तर सुरेश सोनसाळे रा. कुरण हा जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती कळताच शहागड पोलिस चौकीचे  पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला रुग्णालयात हलवले. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली असून अपघातातील ट्रक ताब्यात घेतला आहे.