Fri, Jul 03, 2020 18:22होमपेज › Jalna › शिक्षकांची 705 पदे रिक्‍त

शिक्षकांची 705 पदे रिक्‍त

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 2:05AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात शाळा उघडण्याच्या तोंडावर प्राथमिक शिक्षकांची तब्बल 705 पदे रिक्‍त आहेत. तरीही जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग ऑल इज वेल भुमीका घेत असल्याने विद्यार्थ्याच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जिल्हाची ओळख शैक्षणिकबाबतीत मागास जिल्हा अशीच आहे. प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया समजला जातो. अखिल भारतीय पातळीवरील असर या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील 70 ते 80 टक्के विद्यार्थ्यांची शैक्षणिक परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे दर्शविण्यात आले आहे. राज्यात जालन्याचा खालून क्रमांक दोन आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्‍त राहणे हे भयावह आहे.

 जिल्ह्यात 6 हजार 169 शिक्षकांच्या जागांपैकी 5 हजार 464 पदे कार्यरत असुन  705 पदे रिक्‍त आहेत. त्यात मुख्याध्यापक पदाची 61 पदे, पदवीधर शिक्षकांची 262 पदे, प्राथमिक शिक्षकांची 382 पदे 
रिक्‍त आहेत. 

शिक्षकांच्या पदामुळे दोनपेक्षा जास्त वर्गांना एक शिक्षक शिकवत असल्याने प्राथमिक शिक्षणात आनंदी आंनद आहे. 2017-18 वर्षाकरिता बदलीपात्र 3  हजार 268 शिक्षकांपैकी 2 हजार 164 शिक्षकांच्या ऑनलाइन जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत. या व्यतिरिक्‍त 202 शिक्षक विस्थापित झाले आहेत.

 शिक्षकांच्या रिक्‍त पदाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागांना बसणार आहे. जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात आल्याने त्यांच्या रिक्‍त जागांवर इतर शिक्षक न आल्यानेही मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विकासाच्या मापदंडाचा पाया हा शिक्षण असताना शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष न समजणारे आहे.