Thu, Jul 09, 2020 04:09होमपेज › Jalna › शिवसैनिकांचा तीन कोटी रुपयांचा विमा

शिवसैनिकांचा तीन कोटी रुपयांचा विमा

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 1:02AMघनसावंगी : प्रतिनिधी 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांचा तीन कोटी रुपयांचा विमा मोफत काढून कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण, तालुकाप्रमुख उद्धव मरकड, जिल्हा परिषद सदस्य जीवन वगरे, खालेद कुरेशी, बापूसाहेब देशमुख, शाम उढाण, रवींद्र आर्दड, पंढरीनाथ उगले, डॉ. अशोक गोडसे आदींची उपस्थिती होती.  

यावेळी बोलताना हिकमत उढाण म्हणाले की, आपण नुसते एकटे कट्टर शिवसैनिक असून फायदा नाही तर इतर लोकांना आपल्या सहकार्‍यांनाही शिवसेनेत सामील करून पक्षाची ताकद अधिकाधिक वाढवली पाहिजे. अनेक तरुण किंवा ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, अशा लोकांना शिवसेनेत सहभागी करून त्यांना आपले विचार समजावले पाहिजेत, असे सांगून उढाण म्हणाले की, आगामी वर्षात निवडणुकांचे वेध लागले असून विरोधकांनी याचा धसका घेतला आहे. येणारे वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असून प्रत्येकाने कामाला लागावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन नंदकुमार उढाण यांनी तर दिगंबर उगले यांनी आभार मानले. 

यावेळी पंचायत समितीचे गटनेते अनिरुद्ध शिंदे, रमेश बोबडे, जयराम काळे, सुधाकर कोळे, नीळकंठ भानुसे, शहरप्रमुख अशोक शेलारे, अनिल सानप, बबनराव घोगरे, विष्णू कोरडे, प्रभाकर धांडे, भरत शिंदे, रामनाथ पवार, प्रशांत उढाण, अनिल कोल्हे, दत्ता कोल्हे, युवा सेनेचे दत्तात्रय बेंद्रे, राज घोगरे, अशोक थोरात, धर्मराज आंधळे, अविनाश घुगे यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना स्थापना झाल्यापासून 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करीत आलेली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता कार्य करीत राहिले पाहिजे. शिवसैनिकांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात, त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. घनसावंगी तालुक्यातील शिवसैनिकांकडून केली जात असलेली विविध सामाजिक कामे आणि उपक्रमांमुळे विरोधकांमध्ये कमालीची धास्ती पसरली आहे. 
- हिकमत उढाण, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना जालना जिल्हा