Mon, Jul 06, 2020 14:54होमपेज › Jalna › वेदमंत्रोच्चारात महामस्ताभिषेक

वेदमंत्रोच्चारात महामस्ताभिषेक

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:53AMजालना : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास वेदमंत्रोच्चारात ऐतिहासिक महामस्ताभिषेक   करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

शिवसेनेच्या वतीने यंदा प्रथमच महामस्ताभिषेकाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी गणेश पूजन, इशस्तवन, अथर्वशिष्य, पंचसुक्त, श्रीसुक्त, रूद्राभिषेक करण्यात आला. सकल जनकल्याणार्थ राष्ट्रीय प्रार्थना भगवती पुरोहित संघाच्या वतीने गायली. अश्‍वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते दूध, दही, गोमूत्र, उसाचा रस, मध अशा पंचामृताद्वारे महामस्ताभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी युवा सेना राज्यकार्यकारिणी सदस्य जगन्नाथ काकडे, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, आत्मानंद भक्त, दीपक रणनवरे, नितीन जांगडे, गोपीकिशन गोगडे, राजू माधोवाले, घनशाम खाकीवाले, संतोष सलामपुरे, अंकुश पाचफुले, दुर्गेश काठोठीवाले, नरेश खुदभैय्ये, किशोर शिंदे, सागर पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुशील भावसार, उमेश भगत, धीरज भगत, शंकर मोहिते, नरेश भगत, राजेश कांबळे, नितेश त्रिंबके, मिलिंद पाटील, सुनील चंद, विनेश कड, कैलास बुलबुले, चरण पाटील, गणेश विसपुते, भरत परदेशी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दुर्गेश काठोठीवाले यांनी केले तर आभार दिनेश भगत यांनी मानले. भगवती पुरोहित संघाच्या वतीने वेशास विनायक महाराज फुलंब्रीकर, विजय महाराज फुलंब्रीकर, डॉ. राजेश सामनगावकर, गणेश मांडे, दीपक रुद्रे, विजय मंठेकर, आनंता जोशी यांनी पौरोहित्य केले.