Fri, Jul 03, 2020 20:10



होमपेज › Jalna › प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या गैरहजेरीत भाजपचे उपोषण

प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या गैरहजेरीत भाजपचे उपोषण

Published On: Apr 13 2018 1:33AM | Last Updated: Apr 13 2018 1:34AM



जालनाः प्रतिनिधी

येथील मामा चौकात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या गैरहजेरीत  गुरुवारी (दि.12) भाजप कार्यकत्यार्र्ंचे उपोषण पार पडले. काँग्रेसने संसदेचे कामकाज बंद पाडून लोकशाहीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ झालेले हे उपोषण प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात होणार होते, मात्र येणार येणार म्हणत उपोषण संपेपर्यंत प्रदेशाध्यक्ष  दानवे उपोषणस्थळी चार वाजेपयर्र्ंत न पोहचल्याने त्यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या भाषणाने उपोषणाची सांगता झाली. जनार्दन मामा यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. 

प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे येणार म्हणून पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून होते, मात्र व्यासपीठावरील नेत्यांची  लांबलेली भाषणे  झाल्यानंतरही दानवे यांचे उपोषणस्थळी आगमन न झाल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता पसरली होती.  

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे यांनी काँग्रेसने गेल्या साठ वषार्र्ंत कोणतीही कामे न करता जातीय वादाच्या नावावर सत्ता उपभोगल्याचा आरोप केला. साठ वर्षे सत्ता भोगणारी काँगेस मोदींना त्यांच्या साडेतीन वषार्र्ंच्या काळात केलेल्या कामाचा हिशेब मागत आहे. काँग्रेसच्या नेत्यांना भाजप सरकारच्या काळात  कोणतेही मुद्दे न सापडल्याने संसद बंद पाडून देशाला वेठीस धरण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप भांदरगे यांनी केला. यावेळी उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक कारभारामुळे अनेकांची देशात अडचण झाली आहे. त्याविरोधात सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दानवे म्हणाले. यावेळी देवीदास देशमुख, किरण खरात, सिध्दिविनायक मुळे यांच्यासह जिजाबाई जाधव, कमल तुल्ले, नगरसेविका संध्या देठे, विजया बोरा आदींची भाषणे झाली.