Thu, Jul 09, 2020 04:53होमपेज › Jalna › आसूड मोर्चाचा समारोप होणार भोकरदनमध्ये

आसूड मोर्चाचा समारोप होणार भोकरदनमध्ये

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 11:46PMभोकरदन : प्रतिनिधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या आसूड यात्रेचा समारोप शुक्रवार, 25 रोजी भोकदन येथे होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या आसूड यात्रेसाठी किती गर्दी जमणार  व आमदार बच्चू कडू काय बोलणार या कडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोकरदनमध्ये शुक्रवारी सायं. 5 वाजता आमदार बच्चू कडू यांच्या आसूड यात्रेचा समारोप होणार आहे. या निमित्त   प्रा. डॉ. अंकुश जाधव, श्रीमंत  राऊत, नानासाहेब वानखेड़े यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप सरकारने शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याचा व  भूलथापा मारून सत्ता मिळवल्याचे त्यांनी सांगितले. दिलेले आश्वासन सरकार पाळत नसल्याने शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आसूड यात्रा सुरू आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभाडी येथे 2014 मध्ये ‘चाय पे चर्चा’ करायला आले असताना सत्तेत आल्यास शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50 टक्के हमीभाव देऊ हा त्यांचा शब्द होता. याच दाभाडीत मालाला भाव नाही म्हणून पंधरा शेतकर्‍यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. सरकारच्या आश्वासनाचे काय झाले याचा जाब विचारण्यासाठी 22 ते 26 मे दरम्यान आसूड यात्रेचे आयोजन केले आहे. 

सभेला उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.अंकुश जाधव, श्रीमंत राऊत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नानासाहेब वानखेडे, नारायण सहाने, प्रा. भाऊसाहेब ठाले, गजानन जाधव, शिवाजी तांबडे आदींनी केले.