Tue, Jun 15, 2021 13:13होमपेज › Jalna › जालना : 'व्हॅलेंटाईन डे'लाच पोलिसाची आत्महत्या

जालना : 'व्हॅलेंटाईन डे'लाच पोलिसाची आत्महत्या

Last Updated: Feb 24 2020 1:26AM

संग्रहित छायाचित्र 

 

जालना : पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद तालुक्यातील मौजे सवासणी येथील पोलिस दलात कार्यरत असलेले विष्णू रामभाऊ गाडेकर (वय ३५ वर्ष) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. याबाबत मयताची पत्नी अनिता विष्णू गाडेकर यांनी जाफराबाद पोलिसात शुक्रवारी (दि. १४) रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. 'व्हॅलेंटाईन डे'लाच ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाचा : ‘एल्गार’ प्रकरण आता ‘एनआयए’ न्यायालयात

 याबाबत अधिक माहिती अशी की मयत विष्णू गाडेकर हे बुलढाणा पोलिस दलात कार्यरत होते. सद्य:स्थितीत ते बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे नोकरीला व वास्तव्यास होते. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास विष्णू गाडेकर यांनी देऊळगाव राजा येथील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

वाचा : राज्यसभेसाठी उदयनराजे मैदानात

अनैतिक संबंधातून त्रास दिल्यामुळे ही आत्महत्या झाली असल्याचा संशय मयताच्या पत्नीने तक्रारीतून व्यक्त केला आहे. या प्रकरणी कलम ३०६ व ३४ नुसार जाफराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे हे करीत आहे.