Thu, Jan 30, 2020 01:41होमपेज › Jalna › जालना : कार- दुचाकी अपघातात एक ठार

जालना : कार- दुचाकी अपघातात एक ठार

Last Updated: Dec 07 2019 8:39AM

संग्रहित छायाचित्रजालना : प्रतिनिधी

भोकरदनपासून आठ किलोमीटरवर असलेल्या जालना महामार्गावर सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान बरंजळा पाटीजवळ कार व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. यात दुचाकीस्वार शिक्षक संदीप उबाळे हे जागीच ठार झाले. 

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मयत संदीप उत्तमराव उबाळे (वय 35, रा. मोंढाळा, ता. जि. बुलढाणा) हे भोकरदनमधील शिक्षक कॉलनीमधील रहिवाशी असून हे जानेफळ मिसाळ या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते कर्तव्यावरून दुचाकीवरून परत येत असताना हा अपघात झाला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बरंजळा पाटीवर एम. एच. 28 8570 ही मारुती अल्टो व होंडा शाईन क्र. एम एच 28 बीई 2309 यांची बरंजळा पाटीजवळ समोरासमोर धडक बसली. यात दुचाकीस्वार शिक्षक उबाळे हे जागीच ठार झाले आहे. तर कारचालक हे गाडी सोडून पसार झाले.

उबाळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.