Sat, Sep 19, 2020 11:15होमपेज › Jalna › जालना : आरोग्य सेविकेला मारहाण, एकाला अटक

जालना : आरोग्य सेविकेला मारहाण, एकाला अटक

Last Updated: Aug 29 2020 1:43AM

संग्रहित छायाचित्रवडीगोद्री (जालना) : पुढारी वृत्तसेवा 

अंबड तालुक्यातील भांबेरी येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला म्हणून त्यांच्या संर्पकातील व्यक्तीला अंबड येथे का पाठवले. या कारणाने प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्री येथील आरोग्य सेविका ताराबाई आहिरे (वय ४४) आणि यांचे पती खंडुजी शिंदे यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली, तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२५) घडली असून सोमवारी (दि.२७ रोजी) शहागड येथील पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी गणेश सर्जेराव कणके (वय २५) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

जालना : अंबड नगर परिषदेत मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भांबेरी येथील ७० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्या संपर्कातील ८ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच पुढील तपासणीसाठी त्यांना जालना येथे पाठविण्यात आले. याबाबत गणेश कणके याने आरोग्य सेविका ताराबाई आहिरे यांच्या सोबत वाद घालून संबंधित व्यक्तींना जालना येथे कशाला पाठवता म्हणून नोंद वही फाडली, धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमक्या दिली. त्यानंतर आहिरे यांचे पती खंडूजी शिंदे यांना लाकडी काठीने डाव्या खांद्यावर मारून दुखापत केली. आहिरे यांच्या तक्रारीवरून शहागड येथील पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी गणेश कणके याला अटक केली आहे. 

जालना : लडाखमध्ये कर्तव्य बजावताना वरुडच्या जवानाचा अपघाती मृत्यू

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्रीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशिल जावळे, आरोग्य सहायक ए.डी.चाळक, आरोग्य सेवक एच. ए. शेख, आरोग्य सेवक वाय. बी. बळी, नितीन बिबे, वराडे, आशा गटप्रर्वतक उज्ज्वला दखने यांनी भेट देऊन गावातील नागरिकांची तपासणी केली व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 "