Sun, Aug 09, 2020 10:50होमपेज › Jalna › परतूरमध्ये सव्वाशे बालके कुपोषित

परतूरमध्ये सव्वाशे बालके कुपोषित

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 12:16AMपरतूर : प्रतिनिधी

तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुपोषित बालकांची संख्या सव्वाशेपर्यंत गेली आहे. डिसेंबर 2017 मध्ये एकूण कमी वजनाची 125 कुपोषित बालके आढळली. एकात्मिक बाल विकास सेवा महिला योजना प्रकल्प व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा महिला योजना प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार, तालुक्यात एकूण 0 ते 5 वर्षे बालकांची संख्या 12 हजार 678 आहेत तर वजन केलेली बालके ही 11 हजार 334 आहेत. सर्वसाधारण श्रेणीत 10 हजार 554 तर मध्यम कमी वजनाची 655 तर तीव्र कमी वजनाची कुपोषित 125 बालके आहेत.

तालुक्यात बीटनिहाय बालक संख्या अशी 

आष्टी 1 बीटमध्ये 0 ते 5 वर्षे बालकांची संख्या ही 2 हजार 536 आहे. वजन केलेली बालके 2 हजार 505 आहे, तर सर्वसाधारण श्रेणीत 2 हजार 446 आहेत. मध्यम कमी वजनाची 47 आहेत, तर तीव्र कमी वजनाची कुपोषित 12 बालके आहेत. आष्टी 2 मध्ये एकूण 1 हजार 834 तर वजन केलेली बालके 1 हजार 640 आहे. 

सर्वसाधारण श्रेणीत 1496 तर मध्यम कमी वजनाची बालके 120 आहेत. तीव्र कमी वजनाचे कुपोषित 24 आहेत. सातोना बीटमध्ये एकूण 2180 बालके आहेत तर वजन केलेली 2005 आहेत. सर्वसाधारण श्रेणीत 1872 आहेत. मध्यम कमी वजनाची 100 आहेत. तीव्र कमी वजनाची कुपोषित 33 सर्वाधिक जास्त आहेत. 

वाटूरमध्ये 1962 बालके
वाटूर बीटमध्ये 1962 बालके आहेत तर वजन केले 1522 आहेत. सर्वसाधारण श्रेणीत 1373 आहेत. मध्यम कमी वजनाची 135 तर तीव्र कमी वजनाची कुपोषित 14 आहेत. श्रीष्टी बीटमध्ये 2224 बालके आहेत, तर सर्वसाधारण श्रेणीत 1769, मध्यम कमी वजनाची 127 तर तीव्र कमी वजनाची कुपोषित 19 आहेत. अंबा बीटमध्ये एकूण 1942 तर वजन केलेली 1747 बालके आहेत.  सर्वसाधारण श्रेणीत 1598 तर मध्यम कमी वजनाची 126 तर तीव्र कमी वजनाची कुपोषित 23 बालके आहेत. 

तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा महिला योजना प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षिकांची नेमणूक केली. मात्र या पर्यवेक्षिका परतूर तालुक्यात आपल्या नेमून दिलेल्या बीटवर न राहता दुसर्‍या तालुक्यातून अप-डाऊन करीत असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी स्पशेल अपयशी ठरत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करावे. अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे अप-डाऊन थांबवावे, अशी मागणी जोर धरत आहे.